Prakruti Jiyofresh
Couldn't load pickup availability
आयुर्वेदामध्ये पथ्याला अतिशय महत्त्व आहे. आजही सर्वजण 'मला पथ्य काय ?' असे विचारतात. म्हणजे खरंतर मनात भीती असते की, अळणी, मसाला नसलेले , चव नसलेले पदार्थ खायला सांगतात की काय ? नेमका आवडीचा पदार्थ वर्ज्य तर नाही ना होणार? पण काहीजण 'गरम गरम भजी खाल्ली की सर्दी गायब!' असे सांगतात. पथ्यात सर्व पदार्थ हे बेचवच असतात, असा सर्वसाधारण समज असतो. पण या
पुस्तकानुसार सांगायचे झाले तर पथ्यकर पदार्थ दुप्पट चवदार असतात असे म्हणावे लागेल. आयुर्वेद जसे व्याधी होऊ नये म्हणून उपाय सुचवतो, तसेच व्याधी झाल्यावर काय खावे हेही नमूद करतो. पण हे पदार्थ केवळ पथ्यकऱ्यांनीच खावेत असे नाही. शरीराचे बल सुधारून व्याधी होऊच नये म्हणूनही याचा उपयोग निश्चित आहे.
तर मग अशा आरोग्यदायी आहार योजनेकडे वळू या.
वैद्य सुयोग दांडेकर यांच्या 20 हून अधिक वर्षांपासूनच्या अध्ययनातून खास आयुर्वेदाचा पुरेपूर वापर करून आपल्या आरोग्यसाठी रुचकर तरीही पथ्यकर अशा खूप साऱ्या पाककृतींचा संग्रह असलेले पुस्तक आजच मागवा आणि चमचमीत परंतु आरोग्यदायी पदार्थांचा आस्वाद आपण आणि आपल्या परिवासाठी
