Prakruti Jiyofresh
Couldn't load pickup availability
Your Action Plan for Weightloss
✅ वजन आटोक्यात ठेवण्यासाठी आवश्यक सर्व काही माहिती साठी जरूर वाचा
✅ खास आहार नियोजन मार्गदर्शन
प्रिय वाचक मित्रांनो आणि बंधु भगिनींनो,
आज वजन कमी करण्याची संजीवनी पाजणारी शंभर एक पुस्तकं बाजारात आहेत आणि तरीही पृथ्वीचं वजन काही कमी होताना दिसत नाही. आता असं असताना अजून एक पुस्तक लिहून मी काय साधणार असा प्रश्न तुम्हाला पडणं अगदीच स्वाभाविक आहे. पण जर हे पुस्तक नुसतं चाळायला लागलात तरी
तुम्हाला त्यात पानापानावर अक्शन प्लॅन्स दिसतील.
आता बजनाचा मुळात जायुर्वेदाशी संबंधच काय असा प्रश्नही काही सुज्ञ वाचकांना पडेल, त्यांच्यासाठी खुलासा करतो.
आयुर्वेद ही काही एक फक्त वैद्यकीय शाखा नाही. आयु: वेद: अशी त्याची फोड आहे. वर्षानुवर्षे अंगीकारलेली ती एक 'जीवनप्रणाली' आहे. मुळात वजन घटवण्याच्या हजारो पद्धती अस्तित्वात असल्या तरी त्याचा अनेकदा आपल्याला उपयोग का होत नाही याचा वाचकांनी जरूर विचार करावा. उत्तर सोपं आहे. पहिलं कारण म्हणजे वजन घटवण्याच्या पद्धती आपण उपचारासारख्या वापरतो पण आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक न बनल्यामुळे ती उपचार पद्धत आणि आपण यातलं अंतर वाढतच जाते... आणि एक दिवशी पटकन संपूनही जातं... आणि मग पहिले पाढे पंचावन्न।
दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आयुर्वेद ही 'वैयक्तिक प्रकृती चिकित्सेवर' आधारलेली गोष्ट आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बाजारात विकत मिळणारे कपडे आणि आपल्या नेहमीच्या शिंप्याने शिवलेले कपडे यात कुठले कपडे आपल्याला शोभून दिसतात, तुम्हाला माहीतच आहे. जर कपड्यासारखी गोष्ट या प्रकारामध्ये आपल्याला चालत नाही, तर आपलं शरीर, जे आपल्या एकट्याचं शरीर आहे, त्याला बाजारातल्या कुठल्याही पद्धतीचा अवलंब करून सुटौल बनवणं हे केवळ हास्यास्पद आहे.
शेजारच्या नानांनी डाएट मील वर वजन कमी केले, जोशीकाकूनी जीम लावली आणि पटापटा वजन कमी करायला सुरुवात केलीय... मानसीने... ह्या असल्या गण्यांनी आपण आपला वेळ मजेत घालवतो, विनोद म्हणजे त्यावरची पुस्तकं वाचतो आणि आपल्याला लगेच हलकं वाटायला सुरूवात होते! (?)
गमतीचा भाग सोडून देऊन मूळ विषयाकडे वळतो. प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टच्या माध्यमातून मी अनेक लोकांना भेटतो तेव्हा लक्षात येतं की वजन कमी करण्यासाठी लोक उत्सुक असतात, कारण असंख्य प्रकारची दुखणी चिकटण्याची त्यांना भीती वाटते. मी त्यांना दोन गोष्टी सांगतो- एक म्हणजे आयुर्वेदाच्या नियमानुसार तुमची प्रकृती ओळखा आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला आहार, व्यायामाचा आराखडा देईन तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. दुसरं म्हणजे जे काही ठरवू ते चिरकाल टिकणारं हवं. तुमच्या आयुष्याचा, जीवनशैलीचा भाग बनणारी गोष्टच स्वीकारा... नाहीतर परत तुम्ही काही दिवसांनी पश्चात्तापच करत बसाल.
या अशा अनेक पद्धती या पुस्तकात सांगण्याचा प्रयत्न केलाय. खरंतर आयुर्वेदिक चिकित्सा करूनच मग गोष्टी सांगाव्यात. पण सर्वदूर पसरलेल्या वाचकांच्या सोयीसाठी ह्या पुस्तकाची रचना अशी केलीय की तुमची साधारण प्रकृती तुम्ही ओळखू शकाल व ती जीवनशैली तुम्ही आत्मसात कराल.
तुमच्या वजन घटवण्याच्या नवीन प्रोजेक्टला माझ्या शुभेच्छा. आमच्याकडे जरूर भेटायला या. तेव्हा बोलूच...
आपला,
वैद्य सुयोग दांडेकर

